सारोळे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
सारोळे ( भोर )मंगेश पवार
डिलिजंट नर्सिंग ट्रस्ट यांच्या वतीने सारोळे( ता.भोर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये मोतीबिंदू सल्ला व त्यावरील मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. या ट्रस्टच्या वतीने १०जणांना मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करून देण्यात येणार आहे.
डोळ्यांचे महत्त्व दृष्टी नसलेल्या व्यक्तीला समजते. दृष्टी असेल तरच सृष्टी आहे. दृष्टी हिनांना ही दृष्टी दाखवण्यासाठी ग्रामीण भागात या शिबिराचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे सारोळे ग्रामपंचायतचे मा. उपसरपंच महेश धाडवे यांनी सांगितले.
यावेळी ग्रा. उपसरपंच झुंजार धाडवे,ग्रामसेवक बिराजदार,सा.कार्यकर्ते दत्तात्रय पवार, गंगाधर धाडवे, सोसायटी मा. चेअरमन विलास साळुंखे,अंकुश राजपुरे,रोहिदास मोरे, मा. उपसरपंच बाळू आवटे, स्वाती पवार, मच्छिंद्र धाडवे, शांताराम धाडवे,रवींद्र धाडवे आदी उपस्थित होते.


