आशा किरण सोशल फाउंडेशन व गुरुकुल मार्शल आर्ट अकॅडमि याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले! दिवाळीत फटाके वाजवताना काळजी घ्या ! फटाक्यांमुळे कान, नाक, घसा व डोळ्याच्या आजारांमध्ये होते वाढ
सारोळे : आशा किरण सोशल फाउंडेशन व गुरुकुल मार्शल आर्ट अकॅडमि याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले.
फटाक्यांशिवाय दिवाळी शक्यच नाही. मात्र असे असले तरी या फटाक्यांमुळे तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व, बहिरेपणा, श्वसनाचा त्रास, दमा यासारखे विकार होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फटाक्याचा आवाज व त्यातून बाहेर पडणारा धूर याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वृद्धांबरोबरच अस्थमा, सायनस व धुराची अॅलर्जी व आजारी असलेल्या लोकांना अधिक होतो. त्यामुळे दिवाळीनंतर कान, नाक, घसा व डोळ्याच्या आजरांमध्ये सुमारे पाच टक्क्यांनी वाढ होत असल्याने फटाके फोडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बार, चिमणी बार, ताजमहल, लवंगी, सुरसुरी, पाऊस, चक्र, फुलबाजा यांच्याशिवाय दिवाळीत आतषबाजी करायला मजा येत नाही. पण या आतषबाजीतून होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यामुळे नाक, कान, घसा व डोळे यांच्या समस्या निर्माण होत आहेत.
डोळ्यांची निगा कशी राखाल
फटाके फोडताना गॉगल्स, चष्म्याचा वापर करणे, लहान मुलांना शक्यतो लांब ठेवावे. फटाक्याची वात पेटवल्यानंतर लवकरात लवकर लांब जाण्याचा प्रयत्न करावा. फटाके फोडताना डोळ्यात काही गेल्यास डोळे चोळू नये. घरी आल्यानंतर डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. जेणेकरून डोळ्यात उडालेले शोभेच्या दारूचे कण साफ होण्यास मदत होते.
कानाची निगा कशी राखाल
फटाके फोडताना इअर प्लग, कापसाचे बोळे कानात घालावे. जेणेकरून आवाजाची तीव्रता कमी होऊन कानाच्या पडद्यावर आघात होणार नाही. जास्त आवाजाचे फटाके फोडू नये. शक्यतो चक्री, पाऊस, सुरसुरी यासारखे फटाके फोडावेत.
नाक व घशाची इजा कशी राखाल धुराची एलर्जी असलेल्या लोकांनी शक्यतो फटाके फोडण्यापासून दूरच राहावे. फटाके फोडायचे झाल्यास धूर न करणारे व कमी आवाजाचे फटाके फोडावेत. दम्याच्या रुग्णांनी फटाक्यांपासून लांबच राहावे.
फटाक्यांचा तीव्र आवाज कानावर पडत असेल तर कानाचा पडदा फाटून कायमचे बहिरेपणा येते. दिवाळीत वाजणाऱ्या या फटाक्यांमुळे कानाचा पडदा फाटण्याबरोबरच कानाची नसही खराब होण्याची शक्यता असते. कानाचा पडदा फाटल्यास किंवा कानाची नस खराब झाल्यास कायमस्वरुपी बहिरेपणा येतो. कान, नाक, घसा आवाजाप्रमाणेच फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळेही आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अलर्जीचा त्रास असलेल्या लोकांना धुरामुळे लगेचच त्रास होतो. फटाक्यातून बाहेर पडणारा धूर व उडणारे कण यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता अधिक असते.
मोठ्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटून ऐकायला कमी येते. यावर वेळेत उपचार न झाल्यास कायमचे बहिरेपणा येण्याची शक्यता असते. फटाक्यांचा आवाजा हा साधारणपणे लहान मुले व वृद्धांसाठी अधिक घातक असतो. दिवाळीनंतर नाक, कान, घसा व डोळे यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत नेहमीच्या तुलनेत सुमारे चार ते पाच टक्क्यांनी वाढ होत असते,
तरी सर्वानी आपली काळजी घेण्याचे अवाहन गुरकुल अकॅडमि चे अध्यक्ष-किरण साळेकर सर यांनी केले.


