सातारा जिल्ह्यात आर.पी.आय.(खा.आठवले गट)च्या नाराज कार्यकर्त्यांमुळे नेते हतबल
सातारा प्रतिनीधी : आशिष चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व भाजपचे इच्छुक उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांचे पहिल्या यादी त्यांचे नाव आले नाही. आर.पी.आय. (आठवले गटाने) मागणी करून सुद्धा डावल जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला सर्वच कार्यकर्ते महायुतीचे काम करण्यास नाराज असल्याने सर्वच स्थानिक पातळीवरील आर . पी आय नेते हतबल झाल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. परंतु, त्या उमेदवाराबाबत फारशी माहिती दलित- पददलित- कष्टकरी- शेतमजूर व इतर मागासवर्गीय मतदारांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने महायुती व महाविकास आघाडी या दोन बलाढ्य राजकीय गटांमध्ये सामील व्हावे की नाही ? असा यज्ञ प्रश्न आर.पी.आय. आठवले गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना पडला आहे. स्थानिक पातळीवर प्रचार यंत्रणा सुरू झाली असली तरी आर.पी.आय.च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणत्याच कार्यक्रमाला सन्मान दिला जात नाही. त्यांना बोलावले जात नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरले आहे. सातारा जिल्ह्यात किमान ५० हजार मते आहेत .हे पद दिलीत कष्टकरी व शेतमजुरांची आहे ही मतं आरपीआयची वोट बँक समजली जाते.
आज सातारा येथील लेक व्ह्यू हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी केली. तर काहींनी आर.पी.आय.चे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड हे जे भूमिका घेतील. त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठाम राहू असा निर्धार व्यक्त केला.
वास्तविक पाहता युतीकडून न्याय मिळत नसल्याने वेगळा विचार करावा अशीच पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. विचारात घेतले जात नाही .आपला सातारा जिल्हा हा ताकदवान असून मित्रपक्ष जर सन्मान सन्मान ठेवत नसेल तर या ठिकाणी निवडणुकीत आर.पी.आय. आठवले गटाने जर वेगळे भूमिका घेतली तर त्याचा फटका महायुतीला नक्कीच बसेल. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्वाभिमान गहाण ठेवून सोबत राहणे हा राजकीय आत्महत्या आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आरपीआय पक्षाला मानणारे निर्णायक मते आहेत. उमेदवार पाडण्याची भूमिका घ्यावी लागेल. अशा वेळेला सन्मान महत्त्वाचा आहे. असे सातारा जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी आरपीआय खासदार रामदास आठवले गटाचे पदाधिकारी प्राणलाल माने , उत्तम कांबळे, कुणाल गडांकुश, विजय येवले, अनिल गायकवाड, राजू मारोडा हेमंत दोरके, आप्पा तुपे, उत्तम कांबळे, एकनाथ रोकडे पूजा बनसोडे, अशोक मदने, विजय येलवे यांनी या वेळेला तीव्र भावना व्यक्त केल्या. रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक गायकवाड व डॉक्टर संपतराव कांबळे अण्णा वायदंडे, आप्पासाहेब गायकवाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या व योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.