शिक्षण आयुक्तांची भोर तालुक्यातील केंजळ शाळेस भेट! केंजळ जिल्हा परिषद शाळा अतिउत्कृष्ट:- आयुक्त सुरज मांढरे


 

किकवी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ ही शिक्षण क्षेत्रांत आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रेरणादायी व आदर्श आहे .येथील वैविध्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासामध्ये भर घालत आहेत केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अति उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.

 

काल दि. ७ ऑगस्ट २०२४रोजी आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शाळा केंजळला भेट दिली, जवळपास दोन तासाच्या या भेटीदरम्यान शाळेतील सुविधा ,लोकवर्गणी व शासन निधीचा वापर या शाळेने उत्तम करून उत्तम दर्जाच्या उपलब्ध केलेल्या दिसून आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने स्काऊट गाईड कॅम्प, कला क्रीडा विषयक तासिका, आनंददायी शनिवार या सर्व बाबींचा फार प्रभावीपणे वापर केंजळ शाळेतील शिक्षक करीत आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनीची संवाद त्यांनी साधला. बहुतांशी सर्वच बाबतीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळचे विद्यार्थी पारंगत असल्याचे आयुक्त सुरज मांढरे यांना दिसून आले .

ADVERTISEMENT

कला क्रीडा अवांतर वाचन या बाबींनाही नियमित शिक्षणासोबत ही शाळा महत्त्व देत असल्याचे आयुक्त मांढरे यांना दिसून आले. एकंदरीत शाळेचे कामकाज अति उत्कृष्ट असल्याचे शेरा आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शाळा केंजळ यांना दिला. याप्रसंगी भोर पंचायत समितीचे राजकुमार बामणे उपस्थित होते.सारोळा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांच्या हस्ते आयुक्त सुरज मांढरे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांना पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक जे.के. पाटील, उपशिक्षक धनंजय भिलारे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळू व शिंदेवाडी शाळेस भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.

 

 

महावाचन अभियान, आनंददायी शनिवार, शालेय पोषण आहार विद्यार्थी सुरक्षा शालेय मैदान भौतिक सुविधा, दप्तर विना शाळा,हे उपक्रम पाहिले ,त्याचबरोबर वाचलेल्या पुस्तकांवर मुलांचे अभिप्राय,जीवनकौशल्यावर आधारित दैनंदिन जीवनातील व्यवहारातील विविध प्रश्न , त्यांची सोडवणूक कशी कराल या संदर्भात मुलांशी बराच वेळ मनमोकळी चर्चा,व मार्गदर्शन त्याचप्रमाणे विविध उपक्रम पाहणी केली.

आयुक्त सुरज मांढरे

 

मुख्य संपादक :मंगेश पवार

कार्यकारी संपादक :सागर खुडे

मो. नं. 91461 34789

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!