लोकसहभागातून गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज भोर येथे मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर: भोर शहरासह तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा असणाऱ्या कन्या प्रशालेत सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
मुली शिकाव्यात, सन्मानाने उभ्या राहाव्यात या उद्देशाने भोर तालुक्यातील बरेचशे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, प्रयत्न करत असतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मुलींमध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी या उद्देशाने गणवेश वाटपासह, शालेय साहित्याची वाटप करण्यात आले.
या वेळी डॉ. अरुण बुरांडे ( अंधश्रद्धा निर्मूलन समिती – राज्य सल्लागार ),डॉ. विद्या बुरांडे, डॉ. विरेश बिरादार डॉ. योगेंद्र आगटे, सविता कोठावळे ( इनरव्हील क्लब अध्यक्षा), राकेश शेटे, डॉ.अपेक्षा पाटील, डॉ. अश्विनी मुचाटे तसेच इनरव्हील क्लबचा स्टाफ उपस्थित होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या सौ.पाटील आर. डी. व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. यावेळी ४० गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. तसेच इनरव्हील क्लब कडून शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले. डॉ. बुरांडे व सविता कोठावळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणत सौ.पाटील मॅडम यांनी सर्वच दानशूर व्यक्तींचे आभार मानून ऋण व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पाटील व्ही. यू., यांनी तर प्रास्ताविक सौ. मिरजे मॅडम यांनी केले. आभार सौ. कुंभार यांनी मानले.


