सांगलीत 72 तास वयाच्या बाळाचे अपहरण…! अवघ्या 48 तासांनी आईच्या कुशीत बाळ विसावले, महात्मा गांधी पोलीस चौकी आणि सांगली पोलिसांचा सहभाग..!
संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी. सांगलीतील मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून 72 तास वयाच्या तीन दिवसांच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला सिद्धेवाडी (ता.तासगांव) येथे सोमवारी मुलासह ताब्यात घेतले आहे. तब्बल 48 तासांनी सोमवारी रात्री बाळ सुरक्षितपणे आपल्या आईच्या कुशीत विसावले आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून प्रसूतीपश्चात कक्ष क्रमांक 64 येथून शनिवारी (दि. 3 मे.) रोजी सकाळी 12 वाजणेच्या सुमारांस महिलेने कविता अलदार (रा. कोळे ता. सांगोला) या महिलेच्या तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची फिर्याद महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेत दाखल होती. अपहरण करणाऱ्या महिलेने बाळाला औषधाचा डोस देण्याचा बहाणा करीत प्लास्टिकच्या पिशवीतून बाळाची चोरी केली होती. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस यंत्रणा अगदी युद्धपातळीवर गेले दोन दिवसांपासून महिलेचा शोध घेत होते. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे आणि रुग्णालयातील छायाचित्रांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित महिला सारा सायबा साठे (वय 24 रा.) सावळज ता. तासगांव) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले तिने अपहरण केलेले बाळ अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी मातेच्या स्वाधीन केले, अपहरण झालेल्या बाळ 48 तासानंतर आईच्या कुशीत विसावले, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गिल्डा सतीश शिंदे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक स.पो.नि. संदीप शिंदे महात्मा गांधी चौक प्रभारी अधिकारी पंकज पवार स.पो.नि. नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि रूपाली गायकवाड संदीप गुरव धनंजय चव्हाण सुरज पाटील रंजना बेडगे साक्षी पतंगे पो. कॉ. बसवराज कुंदगोळ जावेद शेख विनोद चव्हाण पो.उपनि. सतीशकुमार पाटील चालक पो. उपनि. बाळासाहेब कदम (सायबर पोलीस ठाणेकडील)स.पो.नि. रूपाली बोबडे पो.उपनि. अफरोज पठाण पो.कॉ सतीश आलदार पो.कॉ कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विजय पाटणकर आदीं पोलिसांनी या तपासात सहभाग घेतला. पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे,