चिमुकल्यांच्या दिंडीने “विठ्ठल ” नामाच्या जयघोषात मोहरी गावात दिंडी सोहळा रंगला.
ससंपादक : मंगेश पवार
सारोळे : वारक-यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर शनिवार दि. १३ जुलै रोजी जि.प. प्राथमिक शाळा, मोहरी बु. ता. भोर, जि- पुणे परिसरातील शाळेत दिंडी सोहळा रंगला. विदठल रखुमाई अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. जि.प. प्राथमिक शाळा मोहरी बु आयोजित दिंडीमध्ये १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ व विठू नामाने शाळा ते गावातील मारुती मंदिरापर्यंत मार्ग निनादला.
मुख्याध्यापक बलवान महावीर बिंदू तसेच सहायक शिक्षिका स्वाती जगताप ,राणी पवार ,मालती भदे , प्रतिभा खुटवड ,अमोल गळंगे तसेच ग्रामस्थ शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विजय बिरामणे, दीपक खोपडे,सागर लेकावळे,अमोल लेकावळे,दत्तात्रय बिरामणे, सचिन धनवडे, चंद्रकांत लेकावळे आदी ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते.
” विठ्ठल नामाची शाळा भरली” शाळा शिकताना तहानभूक हरली” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुक्माई च्या बाबतीत यावेळी ज्ञानमंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास उपस्थित ग्रामस्थ आणि महिलांना होत होता. अशा प्रकारे बालचमूंची विठू नामाचा गजर, फुगड्या, टाळाच्या गजरात विठू नामाच्या गजरात दिंडी उत्साहात पार पडली. तसेच आषाढी एकादशीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक प्रबोधन फलक, वृक्षदिंडी, वारकरी दिंडी, पर्यावरण दिंडी,झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती देखील करण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला मोठी यात्रा भरते. त्यामध्ये लाखो भावीक सहभागी होतात. लहान मुलांना या गर्दीच्या वेळी जाता येत नाही. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कशा पद्धतीने असते याचा प्रत्यक्षात अनुभव या विद्यार्थ्यांना यावा यासाठी शाळेतून गावात दिंडी काढून आनंद संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी हा दिंडी सोहळा काढण्यात आला आहे.
मुख्याध्यापक बलवान महावीर बिंदू जिल्हा परिषद शाळा मोहरी बु.