उत्कृंष्ट बाल संगीत कलाकार कु.वीरा गणेश हाके थडी बोरगावकरांची ओळख महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात..!!
संभाजी पुरीगोसावी ( नांदेड जिल्हा ) प्रतिनिधी. कला हेच जीवन आहे असे म्हणतात ते अगदी खरंय आहे. कलेच्या माणसांची आठवण ही प्रत्येकालाच नेहमीच होत असते. मग ती कला कोणतीही असो, अशीच एक बाल संगीत कलाकार आई-वडिलांच्या मार्गदर्शनातून तिची संपूर्ण महाराष्ट्रांच्या आपल्या कलेच्या शैलेतून आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. ती म्हणजे नांदेड जिल्ह्यातील कुमारी वीरा गणेश हाके ही कन्या सर्व सामान्यांन गरीब कुटुंबातील आहे. नांदेड जिल्ह्यातील (थडी बोरगांवकर) ता. नारायगांव (बा.) जि. नांदेड ) येथील ही कुमारी वीरा गणेश हाके ही ( स्वरगंगा ) या नावाने आणि वडील गणेश हाके आई सरस्वती हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आज ती महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात आपल्या कलाशैलीतून चांगलीच चर्चेत आहे. लहानपणापासूनच मराठी हिंदी भक्ती गीते धार्मिक बहारदार अशा गीतांची आवड असणारी ही कुमारी वीरा गणेश हाके बाल संगीत कलाकार म्हणून ओळखले जाते. साखरपुडा,पुरवसंध्या लग्न मंगलाष्टिका,गणेश उत्सव,नवरात्र उत्सव, रिसेप्शन, स्नेहसंमेलन साप्ताहिक अशा आपल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून हाके कुटुंब आपली साधी भोळी सेवा आज महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात करीत आहेत. या हाके कुटुंबास आणि बाल संगीत कलाकार वीरा ला तिच्या उत्कृंष्ट कलेबद्दल आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन मानाचा सलाम आणि शुभेच्छा आहेत.

