काळज ता फलटण येथील झालेल्या निर्घुण खुनाचे गूढ उकलले
उपसंपादक :दिलिप वाघमारे
दिनांक 14/10/2024 रोजी रात्री 7.40 वाजताचे सुमारास काळज ता. फलटण गावी लक्ष्मी देवी मंदीरात नितीन तकदिर मोहीते वय 40 रा. काळज ता.फलटण याचा
अनोळखी इसमांनी खुन करुन ते पसार झालेले होते. त्याबाबत रितेश राजेश मोहीते वय 21 रा. काळज ता.
फलटण जि. सातारा याने सदर गुन्हयाची खबर लोणंद पोलीस स्टेशनला दिली होती. सदरचा खुन करणारे
अनोळखी इसम हे कोण होते व त्यांनी नक्की कोणत्या कारणासाठी सदरचा खुन केला याची उकल करणे हे
सातारा पोलीसांचे समोर मोठे आव्हान होते.
याबाबत समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग व मा. बाळासाहेब बालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन तपासास एक महत्वाची दिशा देवुन आरोपी शोध घेणेकामी सपोनि सुशिल बी. भोसले लोणंद पोलीस स्टेशन यांना सुचना देवुन स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पथक, सायबर शाखेचे अंमलदार यांचे पथक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक, फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक लोणंद पोलीस स्टेशन हदीत गुन्हयाचे अनुषंगाने शोथ घेणेस वेगवेगळी कामगीरी देवुन रवाना केले. सदर गुन्हा तांत्रीक माहीतीच्या आधारे व वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि सुशिल भोसले, त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच सायबर पोलीस अंमलदार यांनी बुदधी कौशल्याचा योग्य वापर करुन सदरचा खुन हा कृष्णा दिपक मोहीते व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी रितेश राजेश मोहीते व काळज येथील एक विधीसंयर्षीत बालक यांचे मदतीने कट करु केला असलेबाबत तपासात निष्पन्न केले आहे.
खून का व कश्यासाठी केला
काळज ता. फलटण येथे नितीन तकदिर मोहीते व विमल महादेव मोहीते दोन्ही कुटंब शेजारी शेजारी राहणारे असुन दोघांचे घरामधील जागेच्या कारणावरुन फेब्रुवारी 2024 मध्ये नितीन मोहीते व विमल मोहीते यांचा वाद झाला होता. त्यावेळी संशयित आरोपपींचे म्हणण्याप्रमाणे मयत नितीन
मोहीते याने विमल मोहीते यांना धक्काबुक्वकी केल्यामुळे त्यांना दवाखान्याला 10 हजार रुपये खर्च आला
होता. त्यानंतर सदरची भांडणे त्यांनी आपसात मिर्टींग घेवुन गावपातळीवर मिटव्ली होती, परंतु विमल मोहीते यांचा मुलगा आरोपी दिपक महादेव मोहीते याने त्याचा राग मनात ठेवला होता. त्यातुनच दिपक महादेव मोहीते वय 47 वर्षे त्याची पत्नी ज्योसी दिपक मोहीते वय 44 वर्ष, मुलगा कृष्णा दिपक मोहीते वय 22 वर्ष तिथे रा. शिवाजीपार्क समर्थनगर नवी सांगवी पुणे मुळ रा. काळज ता. फलटण जि. सातारा यांनी नितीन तकदिर मोहीते याचा खुन करण्याचा कट रचला. आरोपी कृष्णा दिपक मोहीते याने पुणे येथील त्याचे मित्र साथीदार आरोपी नामे यश बबन सोनवणे वय 18 वर्षें रा. मनपा शाळेच्या पाठीमागे सुर्यमंदिराजवळ हडपसर माळवाडी पुणे-28, विशाल अशोक फडके वय 20 रा. नवी सांगवी साई चोक पुणे, ओकार किशोर खंडाळे वय 19 वर्ष रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे, ऋषीकेश तिर्थराज सकट वय 19 रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पूणे, पूणे येथील एक विधीसंघर्षीत बालक व इतर यांचेसह काळज ता. फलटण जि. सातारा येथे दिनांक 13/10/2024 रोजी पासुन येवुन नितीन मोहीते याचेवर पाळत ठेवली होती.आरोपी कृष्णा दिपक मोहीते व त्याचे साथीदार यांना नितीन मोहीते याची माहीती मिळत नसल्याने त्यांनी रितेश राजेश मोहीते व काळज येथील विधी संघर्षत बालकाची मदत घेवून नितीन मोहीते
याचे हालचालीवर लक्ष ठेवले होते. दिनांक 14/10/2024 रोजी सायं. 5.00 वाजलेपासुन रितिश मोहीते व
विधीसंघर्षीत बालक यांनी नितीन मोहीतेच्या हालचाली कृष्णा मोहीते यास फोनवरुन दिल्याने व नितीन
मोहीते हा लक्ष्मी देवी मंदीराचे मंडपामध्ये बसला आहे असे सांगीतलेने रात्री 7.40 वाजताचे सुमारास कृष्णा
मोहीते याने त्याचे साथीदार विशाल अशोक फडके वय 20 रा. नवी सांगवी साई चोक पुणे, औकार किशोर
खंडाळे वय 19 वर्ष रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे, ऋषीकेश तिर्थराज सकट वय 19 रा. पिंपळे गुरव
लक्ष्मीनगर पुणे, तसेच पुणे येथील एक विधीसंघर्षीत बालक व इतर यांचेसह चार मोटार सायकलीवरुन
पालघन, कोयता, चाकु अशी घातक हत्यारे घेवुन येवुन नितीन तकदिर मोहीते याचे डोक्यात,तोंडावर दोन्ही हातावर, दोन्ही पायावर सपासप गंभीर वार करुन चाकू पोटात व छातीत भोकसुन गंभीर जखमी करुन खुन केला आहे.
आरोपीना अटक करुन मा. JMFC फलटण येथे हजर ठेवले असता श्री जे.एन. जाधव JMFC फलटण यांनी आरोपींची दिनांक 27/10/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. तसेच दोन विधीसंघर्षीत बालकांना सातारा येथील निरीक्षण गृहात जमा
करण्यात आले आहे. आरोपीचेकडे सखोल तपास चालू आहे.
सदरचा गुन्हा हा समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कड़कर अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. राहूल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग व मा. बाळासाहेब बालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग, पो.नि. अरुण देवकर स्थागुशा सातारा
यांचे मार्गदर्शनाखाली, तपासी अधिकारी सुशिल बी. भोसले, पोउनि शिवाजी आर. काटे, विशाल कदम,
सपोफी. दिलीप येळे, देवेंद्र पाडवी, पोहवा विजय पिसाळ, नितीन भोसले, पोहवा संजय बनकर, सर्जेराव सुळ, संतोष नाळे, रत्नसिंह सोनवलकर, अतुल कुंभार,योगेश कुंभार,धनाजी भिसे,महेश टेकवडे, प्रविण मोरे, राहल मोरे, शुभांगी धायगुडे, पो.ना. सिदधेश्वर वाधमोडे, पोकॉ. विठठल काळे, केतन लाळगे, सुनिल नामदास, अंकुश कोळेकर, गोविंद आंधळे, अभिजीत घनवट, अमोल जाधव, संजय चव्हाण, जयवंत यादव, मपोकों. स्नेहल कापसे, ऋतुजा शिंदे, भारती मदने, अक्षदा अहिवळे, प्रियंका नरुटे, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे सपोनि रोहीत फर्णे, पोउनि, परितोष दतीर, पोहवा संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फड़तरे, अविनाश चव्हाण, अमीत सपकाळ, प्रमोद सावंत, अमीत झेंडे, स्वर्नील कुंभार, लक्ष्मण जगधाने, अरुण पाटील, अजित कर्ण, राकेश खांडेके, ओंकार यादव, रोहीत निकम, शिवाजी गुरव, रवि वर्णेकर, सायबर शाखेतील मपोहवा श्रदधा माने, प्रशांत मोरे, ऑकार डुबल, जय गायकवाड, फलटण शहर पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन शिंदे, पोहवा धापते, सचिन जगताप अमोल कर्ण, टिके, फलटण
ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पोउनि बदने, पोहवा नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, हणमंत
दडस व अविनाश नलवडे (जि.वि.शा.) यांनी महत्वाची कामगीरी केली आहे.


