उडतारे येथे अपघातात एकाचा मृत्यू भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
वाई प्रतिनिधी :आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील उडतारे येथे दि. ४ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता सतीश आत्माराम शेलार (वय 25), उत्तम आत्माराम शेलार (वय 26 दोघे रा. पळशी ता. पाटण) हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचे चाक कमतर झाले त्यामुळे दिवसाची व्हायबल होऊन पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या मालट्रकचे चाक उत्तम शेलार याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची तक्रार सतीश शेलार यांनी दि.4 एप्रिल रोजी सकाळी 8.56 मिनिटांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली. यावरून अज्ञात ट्रकचालकविरुद्ध भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.