शिव प्रहार प्रतिष्ठानचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित;
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर तालुक्यातील कासुर्डी ते तांभाड रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कासुर्डी फाट्यावर बसस्थानकावर चढून शिव प्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन.
मौजे मोहरी-कासुर्डी ते तांभाड या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहन चालकांना जिवावर उदार होवून रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे खड्यामध्ये पडून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठ्या अंमलदाणात खडडे पडले आहेत. शासन रस्त्यावर कोट्यावधी रुपयांचा निधी टाकत आहे परंतु तेथील ग्रामस्थांना तशा सुखसोयी मिळत नाहीत. त्यामुळे या रस्त्याची खातेनिहाय सखोल चौकशी करून दोषी असण्या-यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिव प्रहार प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केली आहे.
त्याच बरोबर पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे खड्डे भरण्यास तात्काळ सुरुवात करावी. मुरूम व खडी खड्यामध्ये टाकून मलम पट्टी करण्याचे काम करूनये. पावसाळ्यामध्ये ज्या मालाने इमर्शल लिक्वीड टाकून, बी.सी.चा माल टाकून खड्डे भरले जातात अशा मालाने खड्डे भरले पाहिजेत. निवळ बड़ी व मुरूम भरून ग्रामस्थांची दिशाभूल केली जाते असे आंदोलन कर्ते यांच्याकडुन सांगण्यात येत आहे.
आंदोलन सकाळी १० वाजता सुरू झाले असून जवळ जवळ ३ तासाचा अवधी लोटला असून प्रत्यक्ष स्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी आले नसून त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२२ जुलै पासून प्रचंड पाऊस असलेने खड्डे भरणेचे काम शक्य झाले नव्हते तथापी पावसाचे प्रमाण कमी झाल्यास सदर रस्त्यावरील खड्डे हे खड़ी मुरुम अथवा जी. एस. बी. ने भरुन घेण्यात येत आहेत. शिव प्रहार संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांच्या मागणी केले नुसार ईमर्शल लिक्वीड अथवा डांबरीकरणाने खड़े बुजविण्याचे काम हे माहे १० सप्टेंबर २०२४ पहिल्या आठवड्यात विनाविलंब करणेत येईल.
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोर


