खंडाळा शहरात भरला रसिकांचा मेळा,शब्दसुमनांचा वर्षाव.
खंडाळा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
ब्रिलियंट्स इंग्लिश मीडियम स्कूल,शिवाजीनगर रोड,खंडाळा येथे कवितेचा एक अनोखा सोहळा पार पडला.”माझं कवितांचं गाव जकातवाडी, राजधानी सातारा या समूहांतर्गत खंडाळा व वाई,तालुक्यातील कार्यकारिणीचा एकत्रित पदग्रहण समारंभ व खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात एकूण ४० कवींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद पार्टे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून टी.बी.के कंपनी म्हावशी येथील सीनियर मॅनेजर सुशील पंडित उपस्थित होते.त्यावेळी ते म्हणाले माझं कवितांचं गाव जकातवाडी च्या माध्यमातून मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्रातील कवी जन माणसात पोहोचतील यावेळी कवितेचं गाव जकातवाडी अध्यक्ष प्रल्हाद पारटे,उपाध्यक्ष विश्वास नेरकर,कार्याध्यक्ष सुषमा आळेकरी सचिव वसुंधरा निकम,लीना पोटे,प्रा.खराते जयश्री माजगावकर आदी उपस्थित होत्या.कार्यक्रमास वाई, खंडाळा,शिरवळ,जावली येथील कवीही सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे स्वागत राजेंद्र विद्यालय खंडाळा येथील मराठी विभाग प्रमुख विभुते सर यांनी केले.प्रास्ताविक पोपट कासुर्डे सर यांनी केले.गणेश शेंडे यांनी ईशस्तवन व स्वागत गीत स्वतःच्या सुरेल आवाजात सादर केले.यानंतर वाई व खंडाळा तालुक्यातील कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला.
खंडाळा तालुक्याच्या अध्यक्षपदी शिरवळ येथील मनीषा पारंबे,तर उपाध्यक्षपदी सुनिता साबळे व लक्ष्मण नरुटे यांची निवड झाली. सचिव पदाचा मान खंडाळा येथील ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचे जनक शखरात सर यांना देण्यात आला.वाई तालुक्यात अध्यक्षपदी क्रांती राणे पाटील, उपाध्यक्षपदी गणेश शेंडे व मंगला चव्हाण,तर सचिव पद संतोष गेडाम यांना देण्यात आले.
पदग्रहण समारंभानंतर खुले कवी संमेलन झाले.सूत्रसंचालन वाईच्या क्रांती पाटील व खंडाळा तालुक्याच्या उपाध्यक्ष सुनिता साबळे यांनी केले.यात विविध विषयांवर कविता सादर करण्यात आल्या.प्रमुख पाहुणे सुशील पंडित यांनीही एक हृदयस्पर्शी कविता सादर केली. शेवटी कवी वरे सरांनी भैरवी सादर केली
विश्वास नेरकर यांनी कवितेचे गाव जकातवाडी या संकल्पनेतून भविष्यात राबवले जाणारे उपक्रम समजावून सांगितले.अध्यक्ष भाषणातून पार्टे सरांनी सर्व कवींना एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी खंडाळा तालुक्याच्या अध्यक्षा मनीषा पारंबे यांनी सर्वांचा आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


