बालवडी शाळेत उभारली पुस्तक गुढी,उपक्रमशील शाळेचा नाविण्यपुर्ण उपक्रम.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
नाविण्यपुर्ण उपक्रमासाठी ओळख असलेल्या आदर्श बालवडी जिल्हा परिषदेच्या शाळेत पुस्तकांची गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
मुख्याध्यापक भिमराव शिंदे सहकारी शिक्षक महादेव बदक आनंदा सावले अंजना कोंढाळकर आणि विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून ही पुस्तक गुढी उभारण्यात आली.
ADVERTISEMENT
वाचनाने ज्ञान मिळते जीवन समृध्द होते विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी.वाचन संस्कृती रुजावी आणि वाढावी ज्ञानाचा उत्सव व्हावा यासाठी ही पुस्तक गुढी उभारली असल्याचे राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांनी सांगीतले.
शा.व्य.स.अध्यक्ष बापू निकम केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.


