रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शिवप्रहार प्रतिष्ठानकडून आंदोलनाचा इशारा: गोगलवाडी ते सारोळा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोगलवाडी ते सारोळा या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. त्याच्या निषेधार्थ शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे वृत्त ऐकण्यात येत आहे.रस्त्यावरील खड्डयात मोठ मोठे दगडगोटे आणि खडीचा वाळू मिश्रित माल वर आला असेलमुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून खड्ड्यामध्ये घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई पुणेकडे जाणाऱ्या या सारोळा ते गोगलवाडी रस्त्यावर जीवघेणे खड्डेपडले आहेत. परंतु प्रशासन यावर ठोस कार्यवाही न करता मलमपट्टी करण्याचं काम करीत आहे.या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना विद्यार्थी, नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. गाड्यांची या खड्ड्यांमुळे रीम वाकणे आणि इतरही नाहक खर्चाची कामे वाढत असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याशिवाय प्रवास सुखकर होत नाही.हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या मार्गाने नेहमी मालाने भरलेल्या अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच प्रवासी वाहने आणि खाजगी वाहने देखील मोठ्या प्रमाणात रहदारी करीत असल्यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळणी झालेली आहे.रस्त्याची दुरवस्था होऊनही संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.वेळोवेळी फोन वरून किंवा समसक्ष भेट घेऊनही हे गेंड्याच्या कातडीचे प्रशासकीय अधिकारी कोणत्याही प्रकारचें उत्तर देत नाही.यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून, त्यांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, ये-जा करण्यासाठी आवश्यक रुंदीच्या रस्त्याचे तातडीने काम करावे, अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठानचें वतीने संबंधित ठेकेदार बांधकाम विभागास आपल्या निवेदनात करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

 

गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. यासंदर्भात शिवप्रहार प्रतिष्ठानचें संतोष मोहिते यांनी वेळोवेळी संबंधित विभागास लेखी निवेदन देऊनही काही उपाययोजना न केल्याने हे निवेदन देण्यात आले असून जर येत्या ७दिवसांच्या कालावधीत काम पूर्ण न करून देता काही अनपेक्षित घटना घडल्यास सदर प्रकल्प कंपनी संचालक, तसेच बांधकाम ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बांधकाम विभाग कार्यालयसमोर उग्र स्वरूपाचे पत्रात नमूद कोणत्याही एका ठिकाणी २६ऑगस्ट२०२४ रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपल्या १८ऑगस्ट२०२४रोजी दिलेल्या निवेदनात देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!