मालवाहतूक पिकअप गाडीचे भाडे करारमध्ये फसवणूक केल्या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.


 

भोर प्रतिनिधी : सागर खुडे

वाघजवाडी ता. भोर येथील परिष अरविंद जाधव यांनी पिकअप गाडी भाडेकरारमध्ये फसवणूक व गाडीचें अपहरण केल्या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरहोळ येथील चौकात दि.१५जून २०२३रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास परिष जाधव यांनी आपली स्व: मालकीची पिकअप गाडी जितेंद्र कुंभार व त्यांचा मुलगा राहुल कुंभार नायगांव ता.भोर जि.पुणे यांच्या ताब्यात पिकअप गाडी क्र.एम एच १२ई ४८३० ही भाडेकरारावर चालविण्यास दिली होती.

त्यानंतर दि.१डिसेंबर २०२३रोजी जितेंद्र कुंभार यांचा मुलगा राहुल जितेंद्र कुंभार याच्याबरोबर परीस गाडीचा भाडे करार केला होता.

त्या करारामध्ये दर महिन्याला पिकअप गाडी मालक परिष जाधव यांना राहुल जितेंद्र कुंभार यांनी दर महिन्याला २५००० रुपये एवढे भाडे देण्याचे ठरले होते.

परंतु ४ महिने झाले तरी जितेंद्र कुंभार व त्यांचा मुलगा राहुल कुंभार यांच्याकडे गाडी भाड्याचे पैसे मागितले असता त्यांनी आज देतो,उद्या देतो अशी उडवा उडविची कारणे देत वेळ मारून नेत होते. त्यावेळी परिष जाधव यांच्या वडिलांनी गाडी परत मागितली असता,

ADVERTISEMENT

कुंभार यांनी गाडी आणि भाड्याचे रुपये परत दिले नाही आणि गाडी लपवून ठेवली, थोडक्यात गाडीचे देखील अपहरण केले.

त्यामुळे जितेंद्र कुंभार रा. नायगांव चेलाडी नसरापूर ता. भोर जि. पुणे व त्यांचा मुलगा राहुल जितेंद्र कुंभार रा. नायगाव चेलाडी नसरापूर ता. भोर जि.पुणे यांचेबाबत सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सहसंपर्कप्रमुख नागेश गायकवाड यांचेकडे विषय मांडल्यानंतर त्यांचेच मार्गदर्शनाखाली फिर्यादी परिष जाधव यांनी त्या दोघाविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.

 

सदरचा फसवणुकीचा गुन्हा भा.द.वी कलम ४२०’४०६,३४ कलमांतर्गत २९में रोजी किकवी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

अधिकचा तपास पोलिस निरिक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यवंशी, तपासी अंमलदार/पोलिस हवालदार चव्हाण हे करीत आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!