शनिवारी पाटण येथे महाविकास आघाडीचा आभार मेळावा.


पाटण सातारा प्रतिनिधी: शंकर माने

ADVERTISEMENT

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा मेळावा शनिवार दि.१५ जून २०२४ रोजी पाटण येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृह(बा.दे.कॉलेज) येथे पार पडणार आहे. यावेळी आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहे पाटील, पक्षाचे जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  सत्यजित सिंह  पाटणकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार अध्यक्ष सुनील माने, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष हर्षद उर्फ भानुप्रताप कदम, राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार चे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची कारणमिमांसा करण्यात येणार आहे, त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित रहावे अशी विनंती शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!