“श्री क्षेत्र सोमेश्वर “येथे शेवटच्या सोमवारी भाविकांची रीग.


 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

 

निरा : महाराष्ट्रातील शिवभक्तांनी श्री क्षेत्र करंजे येथील प्रतिसोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील (सोमवती अमावस्या )शेवटच्या दि.२ सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी केली होती.

 

धार्मिकदृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून भाविकांमध्ये अमाप उत्साह बघायला मिळाला. यंदा सुमारे ७१ वर्षांनंतर श्रावण महिन्याची सुरवात आणि शेवट सोमवारने झाली आहे. १८ वर्षांनंतर यंदा ५ श्रावण सोमवार आले आहेत. मागील वर्षी अधिक मासामुळे दोन श्रावण महिने होते.भगवान महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात, मात्र श्रावण महिन्यात त्याला विशेष महत्त्व असते. “बम बम बोले “चा गजर करताना भाविक भगवान शंकरापुढे नतमस्तक झाले.

ADVERTISEMENT

यावेळी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भागामध्ये पाऊस असताना ही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. दरम्यान मंदिरात पहाटेपासून विधिवत आरती व विविध पूजा सगळे पार पडले. दुसरीकडे मंदिराच्या आवारात ही जत्रा भरली होती.

यावेळी भोर तालुक्यातील सारोळे गावातील भाविकांनीही “हर हर महादेवाचा” जप केला. यावेळी सारोळे गावातील मा. सरपंच संभाजी घारे, उपसरपंच रोहिदास महांगरे, संतोष धाडवे,शाळा व्यवस्थापक अध्यक्ष योगेश धाडवे,सचिव विजय धाडवे योगेश राजपुरे,विठ्ठल धाडवे,सुनील धाडवे,उद्योजक दिगंबर मळेकर,चेतन मोरे,दत्ता कोटुळे,आदी भाविकांनी श्री क्षेत्र सोमेश्वर येथील भगवान शिवाचे दर्शन घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!