सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी माळेगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला ; बारामती तालुक्यांत अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,
संपादक : संभाजी पुरीगोसावी
बारामती तालुक्यांतील शहर पोलीस ठाण्यात ग्रामीण पोलीस स्टेशन व माळेगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान या दोन्ही पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारल्या नंतर अवघ्या चार ते पाच महिन्यांत तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत, तसेच माळेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांची देखील चार ते पाच महिन्यांच्या आतच सातारा येथे बदली करण्यात आली आहे, अवघ्या काही महिन्यांतच पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या अचानक बदल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्याशी बातचीत केली असता विनंतीवरून आपली पुणे कंट्रोल येथे बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, पोलीस निरीक्षक घोळवे यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळून उत्कृंष्ट कामगिरी बजावली आहे, तर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांची देखील विनंतीवरून पुणे कंट्रोल येथे बदली झाल्याचे सांगितले आहे, तर माळेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांची देखील पुणे ग्रामीण विभागातील चार वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांची सातारा येथे बदली झाली आहे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या जागेवर विलास नाळे तर ग्रामीण पोलीस ठाण्यात गडचिरोली येथील विश्वास जाधव तर आर्थिक गुन्हे शाखा पुणे येथील सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांची बदली झाली आहे.


