फलटणमध्ये हनीट्रॅपचा माया जाल, हॉटेल व्यवसायिकांला प्रेमाच्या जाळ्यांतून लुटणाऱ्या आरोपींच्या फलटण ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या.


 

संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

फलटण शहरांतील एका तरुण हॉटेल व्यवसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या अपहरण करून निर्जन ठिकाणी घेवुन जात मारहाण करून ४ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका महिलेस सात जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित उमेश संजय खोमणे (वय 28 रा.खराडेवाडी ता.फलटण) गणेश बाळू मदने (वय 19 रा. पाचसर्कल खामगांव) कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे ( वय 27 रा. भाडळी खुर्द) जयराज उर्फ स्वागत आनंदराव ( वय 26 रा. झिरपवाडी) आकाश काशिनाथ डांगे (वय 30 रा. भाडळी बुद्रुक ता.फलटण) माया (टोपण नाव) अनिल गजरे अशी अटक केल्याची नावे आहेत, याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरून मागील चार महिन्यांपासून त्याच्या हॉटेलमध्ये एक महिला अधून मधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती, सदर महिलेचा मोबाईल क्रमांक त्याच्याकडे होता, तिचे नाव माया असे ती सांगत होती, सदर महिला ही त्याची ओळख झाल्यानंतर दिनांक 30 रोजी तरुण हॉटेल व्यावसायिकाला ती सोबत घेवुन फिरायला जाण्यासाठी तयार झाली सदर महिलेला सुरवडी या ठिकाणावरून त्याच्या मोटरसायकल वरुन लोणंद,वीरधरण या ठिकाणावरून फिरून येत असताना काळज-बडेखान जवळ दोन्ही इसमांनी त्यांना अडवून आमच्या बहिणीला घेवुन कुठे फिरता असे म्हणून मारहाण केली, त्यानंतर दोशी यांना संशयित इसमांनी त्यांच्यावर बलात्काराची केस दाखल करणार होते अशी धमकी दिली होती, बळजबरीने फोन पे द्वारे 26 हजार रुपये घेतले आणि ४ लाख रुपये घेवुन येण्यास सांगितले नाहीतर नग्न फोटो व बलात्कार केल्याबाबत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती, फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून सदर महिलेचा अखेर शोध घेवुन तिला ताब्यांत घेतले आणि त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले, या टोळीने फलटण लोणंद भागात अनेकांना यापूर्वीही हनीट्रपमध्ये अडकवलेले असल्याची शक्यता आहे, अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलीस ठाण्याशी किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक गुन्हे प्रगटीकरण विभागाचे स.पो.नि. विशाल वायकर शिवाजी जयपत्रे पो.उनि. गोपाल बदने मच्छिंद्र पाटील अंमलदार नितीन चतुरे वैभव सूर्यवंशी श्रीनाथ कदम संदीप मदने अमोल जगदाळे श्रीकांत खरात हनुमंत दडस रशिदा पठाण सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!