न्हावी येथे मतदान दुरुस्ती अभियान! ३०८ तरुणांनी घेतला सहभाग.
संपादक : मंगेश पवार
सारोळे : आगामी येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने कुलदीप कोंडे जि. प. सदस्य युवा नेते भोर, राजगड, मुळशी यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यात प्रथमच बुधवार दि. १७ रोजी न्हावी येथे एसटी स्टँड समोर नवीन मतदान नोंदणी तसेच नाव दुरुस्ती व हरवलेले मतदार ओळखपत्र नवीन काढून दिले.
या राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३०८ नव मतदारांनी नोंदणी केली. येणाऱ्या विधानसभेला ते पहिल्यांदाच मतदान करणार आहे.
यावेळी १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुले आणि मुलींनी येणाऱ्या विधानसभेत मतदान करण्यासाठी नोंद केली. जेष्ठ नागरिक आणि महिला यांनीही मतदान यादीमध्ये दुरुस्ती करून घेतली.
या कॅम्प ची सर्व पाहणी व नवीन मतदार नोंदणी विकास चव्हाण यांनी पाहिली आहे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे,सचिन चव्हाण, सुभाष चव्हाण, विकास चव्हाण, ओमकार चव्हाण, समीर चव्हाण, संदीप सोनवणे ग्रामस्थ मंडळ पेंजळवाडी, ग्रामस्थ मंडळ न्हावी यांनी यशस्वीरित्या कॅम्प पूर्ण केला.
अजून कोणाची दुरुस्ती आणि नवीन नोंदणी करायची असेल तर गुरुवार दि. १८ रोजी भोंगवली ता.भोर जि. पुणे येथे कोणताही मोबदला न घेता फ्री मध्ये देणार आहे.मा. आदर्श जिल्हापरिषद सदस्य शलाका कोंडे यांनी आव्हान केले कि जास्तीजास्त नागरिकांनी नाव दुरुस्ती, नवीन नाव नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे.
तसेच पूर्व भागातील सर्व गावामध्ये येणाऱ्या दिवसात हा कॅम्प राबविण्यात येणार आहे.


