सहाव्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मथुरा उत्तर प्रदेश येथे संपन्न


संपादक: दिलीप वाघमारे

६ व्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र बी मुंबई संघाचा द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्र सी विदर्भ मुले संघाचा तृतीय क्रमांक आला.

नुकत्याच ६ व्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मथुरा उत्तर प्रदेश येथे स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र बी मुंबई संघाचा द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्र सी विदर्भ मुले संघाचा तृतीय क्रमांक आला. या संघामध्ये महाराष्ट्र बी मुंबई संघामध्ये छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणंदचा खेळाडू कुमार संग्राम भगवानराव तांबे याचा समावेश होता व त्याला या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. तसेच महाराष्ट्र सी विदर्भ संघामध्ये छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणंदचे २ खेळाडू सहभागी होते. कुमार रुद्रनील योगेश शेळके पाटील आणि कुमार राजवीर प्रताप गोवेकर या दोन खेळाडू कांस्यपदक मिळाले. याबद्दल सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

ADVERTISEMENT

नाशिक येथे भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव सौ. मिनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे 2 दिवसांचा निवासी कॅम्प पार पडला. मग तिथून मुले मथुरा येथे रवाना झाला व तिथे क्रिकेट संघाला प्राविण्य मिळविले.आपल्या सातारा जिल्ह्यातील शिरपेचात लोणंदच्या विद्यार्थ्यांनी मनाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक व छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणंदच्या अध्यक्ष व प्रशिक्षक कुमारी शुभदा झणझणे पाटील मॅडम (लोणंद) यांनी मार्गदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!