किकवी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी वंदना रामदास अहीरे यांची बिनविरोध निवड.
दि. १८ संपादक : भोर तालुक्यातील महामार्ग लगत असलेल्या किकवी ग्रामपंचायत उपसरपंच पदी वंदना रामदास अहीरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
किकवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच परवीन मौलादीन शेख यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड वंदना रामदास अहीरे यांची करण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी युवा सरपंच नवनाथ सयाजी कदम ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजय गेजगे यांनी वंदना अहिरे यांची बिनविरोध निवड झाली
यावेळी किकवी ग्रामपंचायत सदस्य भास्करराव सपकाळ, संजय राऊत, अमित निगडे, दिपाली काकडे,परवीन शेख, , माजी सरपंच नवनाथ भिलारे, चेअरमन दत्तात्रय भिलारे, माजी सरपंच अर्जुन अहिरे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण घारे, कामगार नेते नारायण भिलारे ,मौलादीन शेख,नरेंद्र मोदी, रामदास अहिरे, चेतन कोंढाळकर, भरत अहिरे,राहुल अहिरे, प्रशांत कोंढाळकर, सुनील अहिरे, प्रफुल्ल अहिरे,राजेंद्र निगडे, उमेश अहिरे ,गणेश भिलारे, दामोदर अहिरे, बबन अहिरे, आणि किकवी ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच वंदना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.


