मोहरी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेहा भिलारे यांची मुंबई पोलीस पदी निवड.


 

दि. १८ संपादक :, मोहरी गावची कन्या कु.नेहा शशिकांत भिलारे हिची मुंबई पोलीस व मुंबई पोलीस चालक पदी निवड झाली आहे.

मोहरी पंचक्रोशीतील नामांकित असे पैलवान बुवा भिलारे यांची ति नात आहे.वडील शशिकांत भिलारे आणि आई ललिता भिलारे यांच नाव खुप मोठ केल आहे. .

ADVERTISEMENT

हे कुटुंब पैलवान क्षेत्रात असल्याने शिक्षणाची कुठल्याच प्रकारची जास्त माहिती नव्हती. पण नेहाने आपल्या अनुभवविश्वातून स्वतःचे असे वेगळे अस्तित्व निर्माण करून मोहरी आणि मोहरी पंचक्रोशीतील लोकांना एक वेगळा आदर्श रचला आहे. मोहरी गावातील शशिकांत भिलारे यांची कन्या मुंबई पोलीस भरती झालेले कळतात भोर, राजगड,मुळशी नेते कुलदीप कोंडे यांनी दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या.मोहरी गावच्या वतीने तिच जंगि मिरवणूक काढून तिच स्वागत करण्यात आले,तसेच गावातील लहान थोरानि तिच कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मा.समिती सदस्य राहुल लेकावळे, दिपक खोपडे, तुकाराम लेकावळे सागर लेकावळे,दतात्रय बिऱ्हामणे,सचिन धनावडे, नथु जानकर सर्वांनी तिच कौतुक करून पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा दिल्या ..

 

माझ्या यशाचे खरे श्रेय आई-वडील, भाऊ व मार्गदर्शक शिक्षक यांना जाते. उच्च शिक्षणाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेऊन यापेक्षा मोठे पद मिळविण्याचा माझा मानस आहे.”

नेहा ललिता शशिकांत भिलारे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!