आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांनो, जातीय,सामाजिक तेढ निर्माण केल्यास कारवाई करणार :- पोलीस निरीक्षक सुनील महाडिक


 

संभाजी पुरीगोसावी ( रत्नागिरी जिल्हा ) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

राज्यांत सध्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे तसेच या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच आगामी सण उत्सव साजरे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनही चांगलेच सतर्क झाले असून. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने फलटण ग्रामीण पोलिसांचा नुकताच रूट मार्च काढला आहे. सदर रूट मार्च हा फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागातील गावांतून रूट मार्च करीत सन 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पोलिसांनी सूचना केल्या. सदर रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस सुनील महाडिक स.पो.नि. विशाल वायकर यांच्यासह दोन पोलीस अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार तसेच सीआरपी जवानांसह आदींनी या रूट मार्चमध्ये सहभाग आपला नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!