छ. शिवराय समजून घेताना हे पुस्तक अमृत आहे : ह.भ.प. शिरीष महाराज मोरे.


 

सातारा प्रतिनिधी: आशिष चव्हाण

संत तुकाराम महाराज यांच्या वंशज ह. भ. प. शिरीष महाराज यांनी लिहिलेला सुंदर ग्रंथ आपल्या भेटीला आलेला आहे. मीही लेखक आहे. गेल्या पाच वर्षात अनेक पुस्तके आली पण पुस्तकाचे प्रकाशन झाल्याच्या एका आठवड्यात पाच हजार पुस्तकांच्या प्रती खपणारे एकमेव हे पुस्तक आहे. छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ही भूमी आहे. साताऱ्याने देशाला हिंदुत्वाचा अभिमान दिला. त्याच साताऱ्यात छ. शिवराय समजून घेताना या पुस्तकाचे लोकार्पण होत आहे. हे पुस्तक ब्रिगेडी व्हायरसचा पर्दाफाश करणारे पुस्तक आहे, अमृत आहे. असे मत शिवव्याख्याते सौरभदादा करडे यांनी व्यक्त केले.

सातारा शहरातील छ. शाहु कला मंदिर येथे रविवारी संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज यांचे छ. शिवराय समजून घेताना या पुस्तकाचे लोकार्पण कण्हेरी मठाच्या संचालिका सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते व शिवव्याख्याते सौरभ कराडे, हिंदू एकताचे अजय पावस्कर, सचिन डोंबाळे, जयराम स्वामी मठाचे विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले.

सौरभदादा करडे म्हणाले, संताना जातीपातीच्या चष्म्यातून पहायला सुरुवात केली. तेव्हापासूनच राष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या प्रतिभा संपन्न विचारधारेला दृष्ट लागली आहे. या पुस्तकाचा गाभा हिंदूत्वाचा आहे. हल्ली पुस्तकांचा जमाना नसला तरीही या जमानात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेलं पुस्तक लगेच उचलल जात. पण पुस्तकात विचार कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण पहात नाही. हे पुस्तक हिंदुत्व विचारांनी भरलेले आहे. या पुस्तकाचा आशय महत्वाचा आहे.

शिरीष महाराज मोरे म्हणाले, या पुस्तकाचे लोकार्पण करत आहे. छ.शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास काही लोक मांडत आहेत. तो खोडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून पुराव्यांसह केलेला आहे. हिंदू समाजाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे. मुलांनी छ. शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासावे, खरे छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज हे लोकांसमोर यावेत. यासाठी हे पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूपदपातशाह होते. हिंदवी स्वराज्य रक्षक होते, असे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

सचिन ढोबळे म्हणाले छ.शिवराय समजून घेताना या पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, चरित्र गेल्या 350 वर्षात अनेक शाहिरांनी गायला, इतिहासकारांनी लिहिला, अनेक इतिहासप्रेमींनी वाचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अमृत आहे. पचवायला अवघड आहेत. आम्हाला शिवाजी महाराज कसे दिसले, अन्याया विरोधात लढताना. त्यावेळी परकीय सत्ता होत्या. इस्लामिक आक्रमणे होती. त्या आक्रमणांना ब्रेक लावण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहे. तेच या पुस्तकातून मांडले आहेत. हे पुस्तक शिवकार्याची शिदोरी म्हणून उपयोगी ठरेल. या पुस्तकात पुराव्यानिशी संदर्भ जोडले आहेत, असे त्यांनी सांगितले.

विठ्ठल स्वामी महाराज यांनीही आपले मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मुकूंद आफळे, सातारा शहर संघचालक अॅङ नितीन शिंगटे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय गाढवे, भक्ती डफळे, मेघा कदम, हेमंत सोनावणे, महेश कदम, अजय बर्गे,प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, नवनाथ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विविध संघटनांचा सन्मान

विविध दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संघटनांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, टीम वसंतगड, वैराटेश्वर प्रतिष्ठान, टीम भूषणगड, राजा शिव छत्रपती परिवार अजिंक्यतारा, टीम दातेगड, बा रायगड परिवार, टीम धर्मवीर गड, शिवक्रांती हिंदवी सेना वैराटगड, शिव शंभो संघटना वर्धनगड, टीम महिमान गड, छावा युवा मंच अतीत, गड झुंजार वैराटगड, शुभम करोती बाल संस्कार वर्ग, बेटी बचावच्या भक्ती डफळे, मेघा कदम, उर्मिला पवार, राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान आर्वी, धर्म रक्षक राजधानी सातारा अजिंक्यतारा, छावा प्रतिष्ठान कामेरी. एक ऐतिहासिक भटकंती भूषणगड, श्री श्रीमंत योगी प्रतिष्ठान अजिंक्यतारा आदी संघटनांचा सत्कार करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!