बावधन येथे बगाड रस्त्यावर पर्यावरण प्रेमींकडून स्वच्छता अभियान.


वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण

वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधन ची बगाड यात्रा दि.30, 31 मार्च रोजी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. बगाड पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविकांनी बगाड रस्त्यावर गर्दी केली होती. यात्रा संपल्यानंतर तेथे कचरा मोठ्या प्रमाणावर झालेला होता ही बाब पर्यावरण प्रेमी संघटनांच्या निदर्शनास आली. त्यांनी बगाड रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवत कचरा गोळा केला. गोळा केलेला कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.

ADVERTISEMENT

 

यात्रा जत्रा म्हणलं की मेवा मिठाईचे दुकान खेळ खेळण्याची दुकाने ही आलीच तसेच काहीसे चित्र बावधन च्या बगाड यात्रेमध्ये पाहायला मिळाले बावधन चे बगाड पाहण्यासाठी बगाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. यात्रा संपल्यानंतर मात्र तेथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते सगळ्या शेतामध्ये तसेच जिथून बगाड गेले त्या मार्गावर लावलेल्या दुकानाच्या ठिकाणी सोललेल्या नारळाची केसरे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या होत्या. ही बाब पर्यावरण प्रेमी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. प्लास्टिक कचरा आणि इतर कचरा वेगळा केला त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत शिवसह्याद्री अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!