धाराशिव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वीकारला पदभार.


 

संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

धाराशिव जिल्ह्याचे आणि वर्दीतला भला माणूस सर्वांशी मनमिळावू राहणारा… सर्वांना सोबत घेवुन काम करणारा सर्वसामान्य नागरिकांना प्रथम न्याय देणारे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून नुकतीच बदली झाली असून, त्यांच्या जागेवर बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून, नव्या पोलीस अधीक्षकांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची धाराशिव जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा ठरली, जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले, मात्र त्यांची कारकीर्द संमिश्र राहिली, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी धाराशिव च्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रै स्वीकारले आहेत त्यांच्याकडूंन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, धाराशिव आणि सोलापूर शेजारी शेजारी असल्यामुळे त्यांनी तेथे केलेले काम हे सोलापूरकरांना चांगलेच परिचयाचे आहे, सोलापूरची सूत्रै हाती घेतल्यानंतर त्यांच्याकडे खरे तर अनेक आव्हाने असणार आहेत, आणि ते लिलया पेलतील एवढीच सोलापूर वासियांची माफक अपेक्षा आहे, लवकरात सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत, अतुल विलास कुलकर्णी हे सन २०१५ तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. एक कर्तव्यदक्ष मनमिळावू आयपीएस अधिकारी जमिनीवर राहून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात काम करत असल्यांचे चंद्रपूर,धाराशिव अशा विविध जिल्ह्यात ते दिसून आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांच्या कामाचा वेग अतुलनीय ठरला, कामापेक्षा कृतीवर भर दिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यासह जिल्ह्यातील नागरिकही त्यांच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले, आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या बद्दल बोलायचे झाले तर … शब्द कमीच पडतील… असे ते आयपीएस अधिकारी आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!