भोर तालुक्यातील आळंदे येथे एकलव्य क्रिडा संस्थेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन
दि. 23 भोर : भोर तालुक्यातील आळंदे येथे एकलव्य क्रिडा संस्थेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त कबड्डी स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य व भोर कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत बाठे भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, भोर तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष केतन चव्हाण,चेअरमन अंकुश चव्हाण, पांडुरंग बाठे, केंजळ गावचे सरपंच अजय बाठे,उपसरपंच किरण येवले, वागजवाडीचे सरपंच गणेश आवाळे,युवा नेतृत्व लहू साळुंखे, राजेंद्र बांदल उपस्थित होते.
एकलव्य करंडक 2024 स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी गजराज एंटरप्राईजेस ठरला तर द्वितीय क्रमांक आझाद वॉरियर्स व तृतीय क्रमांक हिंदवी वॉरियर्स ने पटकवला…स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू साहिल बरदाडे, उत्कृष्ट चढाईपट्टू आनंद बंडी, उत्कृष्ट डिफेंडर विशाल ढोणे हे ठरले.

 
			

 
					 
							 
							