बारामतीत व्यापाऱ्यांना शरद पवारांचे आवाहन : सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा खासदार म्हणून दिल्ली ला पाठवावे.
बारामती :बारामतीकरांनी संधी दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठविला. संसद रत्न पुरस्कार मिळवून त्यांनी बारामतीचा नावलौकिक वाढवला आहे. यंदाही सुप्रियाला चौथ्यांदा संधी द्या असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार दि.22 रोजी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात केले आहे.
बारामती स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले यापूर्वी सुप्रिया सुळे यांना आपण संधी दिली. त्यामुळे त्या खासदार झाल्या आणि त्यांच्या हातून चांगले काम झाले यंदाही सुप्रिया यांनाच संधी द्या तुतारी वाला माणूस हे चिन्ह आपल्याला निवडणूक आयोगाने दिला आहे.
ते चिन्ह लक्षात ठेवा. एकजुटने काम करण्याची ही वेळ आहे. बारामती हे व्यापारी केंद्र बनवले.व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवले आहेत. असे शरद पवारांनी सांगितले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगीताने झाली. तसेच आभार निलेश कोठारी यांनी व्यक्त मानले.


