सातारा कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहांत साजरा”
संपादक :संभाजी पुरीगोसावी
सातारा जिल्हा कारागृहात सोमवार दि. १९ रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमिंत्ताने कारागृहातील सर्व बंद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा कारागृहात असणाऱ्या बंद्यांना समाजाशी जोडून ठेवण्याकरिता समाजातले प्रत्येक सण साजरे करण्यात यावेत आणि त्यातून समाजाशी त्यांना जोडून ठेवता येते. यासाठीच कारागृह प्रशासनाचे ब्रीदवाक्य “सुधारणा पुनर्वसन” यानुसार प्रत्येक उपक्रम कारागृहात घेवुन बंद्यांना त्यांचे मानसिक, शारीरिक व वैचारिक विचारसरणी सुधारेल व योग्य राहील याची देखील कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रकर्षाने दखल घेवुन काम करत असतात.
कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते. या मधून बंद्यांचा समाजाशी असलेला सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला जातो.
आज कारागृहात मैत्री फाऊंडेशनच्या माध्यमांतून सर्व बंद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कारागृहातील सर्व बंद्यांना मैत्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी राखी बांधून सर्वांना आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमास मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्षा सौ. रंजना रावत, सचिव सौ. वैशाली फडणीस, सदस्या सौ. हेमलता जगताप, सौ. मंजुळा लोखंडे, सौ. सविता कदम तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार संजय येळे, राजेंद्र शिंदे, दिलीप बोडरे, अहमद संदे, सुदाम बर्डे, शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड, बालाजी मुंडे, सागर मासाळ, चांद पटेल, प्रभाकर माळी, प्रेमनाथ वाडीकर, गीता दाभाडे, जयश्री पवार, रूपाली नलवडे, मिनाक्षी जाधव, वरिष्ठ लिपिक हेमंत यादव, नानासाहेब डोंगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.