माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली : पुणे येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल.


पुणे प्रतिनिधी :भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रतिभाताई पाटील यांचे वय89 वर्ष आहे.
सांगितले जात आहे की, प्रकृती व्यवस्थित नसल्याकारणाने गुरुवार दि.14 रोजी त्यांना तातडीने उपचारासाठी भारतीय हॉस्पिटलमध्ये हलवले. त्यांच्यावर आता डॉक्टर उपचार करत आहेत.
कायदेतज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. एस टी महामंडळाच्या अध्यक्ष झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. आरोग्य पर्यटन,संसदीय कार्य,

ADVERTISEMENT

 

गृहनिर्माण,समाजकल्याण,सांस्कृतिक,सार्वजनिक,आरोग्य समाज कल्याण, दारूबंदी,पुनर्वसन शिक्षण मंत्री, असे मंत्रीपदे भूषवीत विधानसभेवर फेरनिवड,विधानमंडळ नेतेपदी निवड,राज्यसेवा निवडून गेल्या.
राज्यसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या.1962 ची पहिली निवडणूक त्यांनी लढविली होती. आमदार ते राष्ट्रपती असा त्यांचा सामाजिक,राजकीय आणि प्रशासकीय प्रवास हा थक्क करणारा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!