भोर पोलिस स्टेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन .
भोर प्रतिनिधी: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने भोर पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि.13/03/24 रोजी 16:00 ते 17:45 वा दरम्यान पथसंचलन घेण्यात आले असून, सदर पथसंचालन भोर पोलीस स्टेशन पासून
नगरपालिका आणि बाजारपेठेमध्ये रूट मार्च करण्यात आला, आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने गावात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित राहावी या उद्देशाने शहरातून पथसंचलन / रूट मार्च करण्यात आले. येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये म्हणून पोलीस विभागाने कंबर कसली आहे.
या रूट मार्च साठी पोलीस स्टेशन कडे पोलीस निरीक्षक आण्णा पवार आणि 17 कर्मचारी CISF चे 2 अधिकारी व 42 कर्मचारी तसेच 3 वाहने असे रूट मार्च ( पथसंचलन )मध्ये सहभागी होते.

