श्रीराम सहकारी पॅनल आभार मेळावा
पाटण प्रतिनिधी :शंकर माने
श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर संचालक जिल्हा सहकारी बँक सातारा, श्रीमंत अमरसिंह पाटणकर जनरल सेक्रेटरी शिक्षण संस्था पाटण यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्रीराम सहकार पॅनलला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल सर्व सभासदांचा आभार मेळावा मंगळवार दि.१२ रोजी घेण्यात आला. यावेळी उपस्थित राहून सर्व सभासदांचे आभार मानले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमचे मार्गदर्शक श्रीमंत अमरसिंह पाटणकर , राजाभाऊ शेलार (अध्यक्ष,पाटण तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष),स्नेहल जाधव (महिला अध्यक्षा,पाटण तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)सुभाष पवार (चेअरमन, पाटण दूध संघ),मंगल कांबळे (नगराध्यक्षा, पाटण नगर पंचायत), बबन कांबळे (माजी पं.स.सदस्य), सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.