दुचाकीस चार चाकीची जोरदार धडक ; उपचारादरम्यान वाघजवाडी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू


 

नसरापूर : दुचाकीस चार चाकीची जोरदार धडक झाली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेल होता परंतु दि. १२ रोजी त्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की दि.10 रोजी स 09.00 वा चे सुमारास मौजे काबरे गावचे हददीत काबरे ते देगाव रोडवर खुटवड वस्ती रोडवर जयसिंग जाधव फिर्यादी यांचा मुलगा अमित जाधव वय 18 वर्षे रा. वागजवाडी हा त्याचे ताब्यातील पल्सर मो सा नं MH 14 FJ-0603 ही वरून नसरापुर कांबरे खेबा रोडने कांबरे खेबा बाजुकडे जात असताना समोरून चारचाकी गाडी नं MH14 KS 9447 ही वरील चालक नाव पत्ता माहीत नाही याने अमित यास समोरून धडक देवुन अपघात करून अपघतात अमित यास डोकीस, उजवे हातास, डोळ्यास, डावे पायास किकोळ व गंभीर दुखापतीस व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता निघुन गेला म्हणुन जयसिंग जाधव यांनी त्याचे विरूध्द राजगड पोलिस स्टेशन मध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली होती. या अपघातातील जखमी झालेल्या युवकास प्रथम उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेले होते त्यानंतर पुढच्या उपचारासाठी त्याला श्लोक हॉस्पिटल शिवापूर येथे दाखल करण्यात आले दोन दिवस हा युवक कोम्यामध्ये होता त्यानंतर अकरा तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान त्या युवकाचा उपचाराचा दरम्यान मृत्यू झाला. आज दुपारी चार वाजता त्याच्या वरती वाघच वाडी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!