मोरवाडी येथील 23 वर्षे तरुणाचा निगडे येथे अपघातात मृत्यू. दुचाकी व सोळा चाकी ट्रक मध्ये धडक होऊन झाला अपघात.
कापूरहोळ : भोर तालुक्यातील मोरवाडी येथील 23 वर्षे तरुणाचा निगडे येथे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि.११ रोजी सायंकाळी ७:४५ वा सुमारास मौजे निगडे गावच्या हद्दीत पुणे ते सातारा जाणाऱ्या हायवे रस्त्यावर, राजस्थानी डाब्या समोरून पेन ते सांगली कोळसा भरून जात असलेला ट्रक क्रमांक MH १२ TV ९७८९ ला पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल क्र. MH १२ TE १०७० ने धडक दिली.
या धडकेमध्ये मोटर सायकल चालक ऋत्विक मोरे वय २३ याचा जागीच मृत्यू झाला म्हणून सोमनाथ चव्हाण वय ४६ यांनी त्याच्या विरोधात राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास पो. ना. लडकत करीत आहेत.