घर फोडी करणाऱ्याच्या मुसक्या पाचगणी पोलिसांनी २४ तासात आवळल्या.


 

पाचगणी प्रतिनिधि

ADVERTISEMENT

शाहूनगर पांचगणी येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणारा चोरटा पांचगणी पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केला असून पांचगणी पोलिसांचे या गुन्हा तपासाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.या घटनेची पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळी ९ ते ११ वाजनेचे दरम्यान फिर्यादी रेश्मा श्रीकृष्ण कापसे (रा. शाहुनगर पाचगणी ता. महाबळेश्वर जि. सातारा ) यांचे शाहुनगर पाचगणी येथील राहते घरामधील बेडरूममध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील कपाटाच्या हँडलला अडकवलेल्या लेदरच्या बॅगेमधुन ३६,०००/- रू रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसुत्र व २८,०००/- रू किमतीची ७ ग्रॅम वजनाचे सोन्याची बोरमाळ असा १६ ग्रॅम वजनाचे एकुण ६४,०००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सौ.कापसे यांनी पाचगणी पोलीस ठाणे गु.र.नं.९२/२०२४ भादविसं कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोरटयाविरूध्द मंगळवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाबाबत तसेच गेले मालाबाबत शोध लागावा याकरीता गुन्हयाच्या तपासाबाबत मा.पोलीस अधीक्षक समिर शेख,मा.अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व तपासी अंमलदार पो.ना.श्रीकांत कांबळे ,पो.हवा.कैलास रसाळ,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना.तानाजी शिंदे यांनी गुन्हा उघडकीस येण्याकरीता अथक प्रयत्न करून आरोपी अक्षय बबन पार्टे (वय ३० रा.विवर ता. जावली जि.सातारा)याला अटक करून विश्वासात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिलेली आहे. आरोपी याच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल गुन्हा दाखल झाल्यापासुन २४ तासाच्या आत हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, तपासी अंमलदार पो.ना.श्रीकांत कांबळे, पो. हवा. कैलास रसाळ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना. तानाजी शिंदे यांनी सहभाग घेतला असुन त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांचे मा.पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या घटनेतील आरोपीला पांचगणी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पांचगणी पोलीस ठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!