केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत वाई च्या अभिषेक ओझर्डे यांचे यश
वाई कार्यकारी संपादक : आशिष चव्हाण
सन 2023 साली घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत वाई येथील अभिषेक अभय ओझर्डे यांनी गुणवत्ता यादीत 669 वा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे,
अभिषेक यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल मध्ये तर उच्च माध्यमिक दिशा अकॅडमी व सांगली च्या वालचंद कॉलेज मधून अभियांत्रिकी पदवी घेऊन बेंगलोर येथे प्रायव्हेट कंपनीत नोकरी करीत UPSC चा अभ्यास केला,त्यांचे स्वप्न आय एफ एस होण्याचे असून ते नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले
अभिषेक चे वडील हे केंजळ तालुका वाई येथे ग्रामविकास अधिकारी असून त्यानी ही स्पर्धा परीक्षा तुन PSI होण्याचे स्वप्न पाहिले होते,एका गुणासाठी त्यांची ही संधी हुकली होती मात्र आज मुलगा अभिषेक च्या यशाने त्यांचे स्वप्न साकार झाले या भावना त्यांनी बोलून दाखवल्या,
दरम्यान ही बातमी समजताच वाई पंचायतसमितीच्या वतीने गट विकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच वाई तालुका ग्रामसेवक संघटना,नेते बाळासाहेब चव्हाण यांचे सह विविध मान्यवरांनी व संस्थांनी अभिनंदन करून ओझर्डे पिता पुत्रांचे सत्कार केले,
भुईंज प्रेस क्लब व आय एफ एस राजेश स्वामी अभ्यासिका यांचे वतीने लवकरच अभिषेक याचा सन्मान सोहळा व प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती तिरंगा एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक पै जयवंत पवार व प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ अध्यक्ष राहुल तांबोळी यांनी दिली,


