गोडोली (सातारा) येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मा. ना. शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न.
सातारा प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
साताऱ्यातील गोडोली येथे उभारण्यात येणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय कार्यालय इमारतीचे आज मंगळवार दि. २५/६/२४ रोजी मा. ना. शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते भूमीपूजन संपन्न झाले. या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तळ घर, तळ मजला, पहिला मजला असे एकूण २ हजार २०७.६९ चौ.मी. क्षेत्रफळ असणार आहे. त्याचबरोबर येथे विश्रामगृह इमारतीचेही बांधकाम होणार असून तिचे क्षेत्रफळ ५०४.११ चौ.मी. असणार आहे.
यावेळी मा. ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देत आहे. या विभागाला तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. राज्यात १७ ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या स्वतंत्र इमारतींचे काम सुरू आहे, अशी माहिती मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. तसेच गोडोली येथील नवीन इमारतींचे काम तातडीने सुरू करावे आणि दर्जेदार काम करून साताऱ्याच्या वैभवात भर घालणारी वास्तू निर्माण करावी, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाईनी याप्रसंगी केली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक अभियंता संतोष राखडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


