जिल्हा परिषद शाळा सारोळे येथे” माय रियल हिरो अंतर्गत कार्यक्रम संपन्न.


संपादक : मंगेश पवार

सारोळे : माझा खरा हिरो या उपक्रमांतर्गत गुरुवार दि. २७ रोजी जिल्हा परिषद सारोळे शाळेमध्ये सारोळे गावातील नेव्ही  अधिकारी शुभम शेरे यांना आमंत्रित केले होते.

नेव्ही मध्ये करिअर करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत. कोणते शिक्षण घ्यावे.अभ्यास कसा करावा याविषयी मुलांना नेव्ही अधिकारी शुभम शेरे यांनी सुंदर मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित लहान मुले आणि मुली यांनी प्रश्नांचा भडीमार केला.

या उपक्रमामध्ये परिसरातील खरेखुरे हिरो, यशस्वी लोकांचा शोध घेत त्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम हा दर महिन्याला जिल्हा परिषद सारोळे शाळेमध्ये आयोजित केला जातो.

यामध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिक, उच्चपदस्थ व्यक्ती, आधुनिक शेतकरी इत्यादींना आमंत्रित करतात. यात आपले शिक्षण, बालपण, अभ्यास, शालेय जीवन एकंदरीत ते कसे घडले या सर्वांची माहिती शाळेतील मुलांना मिळावी जेणेकरून चिमुकल्याणमध्येही एक प्रेरणा निर्माण होईल. या हिरोंच्या अनुभवांच्या शिदोरीचा फायदा करून ही मुलेही भविष्यामध्ये त्यांचे आयुष्य यशस्वी करू शकतील. यातून चिमुकली मुले उच्च पदस्थ अधिकारी होऊन त्यांचे आणि सारोळे गावाचे नाव मोठे करतील यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

ADVERTISEMENT

यापूर्वी डॉक्टर सोनल शिंदे यांना आमंत्रित केले होते त्यांनीही अभ्यास किती आवश्यक आहे याविषयी मुलांना विस्तृत असे मार्गदर्शन केले. डॉक्टर सोनल शिंदे यांनी सांगितले की माय रियल हिरोज हा उपक्रम मी शाळेत असताना असता तर कदाचित मी अजून जास्त प्रगती केली असती असे डॉक्टर सोनल शिंदे यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमासाठी सारोळे शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे, उपशिक्षक संदीप सावंत, सहशिक्षिका जया कांचन, छाया हिंगे, वंदना कोरडे, अर्चना वानखेडे, जयश्री शिर्के, कांचन थोपटे आदी शिक्षक वृंद आणि विद्यार्थीसारोळे गावातील तरुण ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!