शिरवळ येथील गट नं १३१९/१ मधील गणेश कुंज नियोजित सोसायटीच्या सदनिका धारकांची फसवणूक! संतोष मोहिते यांनी प्रशासनाला दिला आत्मदहनाचा इशारा
शिरवळ येथील गट नं.१३१९/१ गणेश कुंज नियोजीत सोसायटीतील शिरवळ येथील बिल्डर्स गायकवाड आणि राठी असोसियेट्स यांनी गेली १०वर्षांपासून
गणेश कुंज सदनिकादारांची वेळोवेळी घोर फसवणूक केली आहे.परंतु २०१३ साली ताबा देऊन सुद्धा सोसायटी स्थापन केली नव्हती.काही कालावधी उलटून गेल्यानंतर या सदनिका आराखड्यातील सुख सुविधा दिल्या नाहीत.
मुख्यता त्यामध्ये या सदनिकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठी नाना नाणी पार्क, लहान मुलांना खेळण्यासाठी छोटेसे मैदान, जिम हॉल, क्लब हॉल अशा प्रकारच्या सर्व सुविधा दिल्या नाहीत. ५/८/२०१७ मंजूर केलेले रजिस्ट्रेशन रेरा यांनी ३०/४/२२ चा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याने ते रद्द झाले . तसेच सदनिका धारकांची झालेली फसवणूक व आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या सदनिकेच्या विकासकांकडून संपूर्ण मालमत्ता जप्त करून त्यातूनच सदर पैशाचा परतावा करण्यात यावा.या निवेदनाचा तात्काळ विचार करून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचा आदेश दिनांक ५/१०/२०२१ यावरून दिनांक ५/८/२०१७ चा सुधारीत इमारत बांधकाम आराखडा तात्काळ रदद करणे गरजेचा होता व आम्हा ४६ सदनिका धारकांना न्याय मिळाला पाहिजे होता.
न्यायाधिश सिनियर डिव्हीजन सातारा येथे री.दि.मु.नं.१८१/२०१७ दाव्यामध्ये बिल्डर्स आनंद सर्जेराव गायकवाड, पुरुषोत्तम राठी, सविता आनंद गायकवाड, सोमनाथ राठी या बिल्डरांनी न्यायालय मध्ये दावा चालू असताना इमारत बांधकाम स्थगिती दिली असताना ही बाब शासनाच्या निदर्शनास येवून दिलेली नाही याबाबत त्या अनुषंगाने शासनाची, न्यायालयाची व सदनिका धारकांची पिळवणूक केली.
या सोसायटीचे मुख्य प्रवर्तक संतोष मोहिते पुढील शासकीय आधिकारी यांना त्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये संदर्भिय विषयामध्ये नमूद असणारे पत्रांचा समावेश आहे.
खालीलप्रमाणे मा. जिल्हाधिकारी सो. सातारा यांना दि.९/१/२०१७ चा हरकत अर्ज,मा.नगर रचना अधिकारी सातारा यांना दि.९/१/२०१७ चा हरकत अर्ज,मा. उपविभागीय अधिकारी साो. वाई यांना दि.९/१/२०१७ चा हरकत अर्ज,मा. तहसिलदार साो. खंडाळा यांना दि.९/१/२०१७ चा हरकत अर्ज,मा. दिवाणी न्यायाधिश सिनियर डीव्हीजन सातारा यांचा दि. १९/४/२०१७ चा स्थगीती आदेश,अँडव्होकेट ठाकूर-देसाई यांचे नोटीस दि. २०/४/२०१७ रोजीचे वरील सर्व शासकी अधिकारी यांना,बिल्डर गायकवाड राठी यांचे खोटे प्रतिज्ञापत्र दि.२८/७२०१७ रोजीचे,मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी तहसिलदार खंडाळा यांना दि.०१/११/२०१८ चा केलेला आदेश,मा. तहसिलदार खंडाळा कं. जमिन/कावि-१७४९/१८दि.१४/११/२०१८ चे पत्र,मा. जिल्हाधिकारी यांची सुधारीत इमारत बांधकाम आराखड्यास मंजूरी दिलेली ऑर्डर, दिनांक ५/८/२०१७.
दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत आम्हाला न्याय न मिळाल्यास सोसायटीचे मुख्यप्रवर्तक आणि संतोष ज्ञानोबा मोहिते विभागीय आयुक्तकार्यालया समोर आत्मदहन करणार आहे.
याचा संबंधित विभागाला पत्र व्यवहार केलेला आहे.


