मामुर्डी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश धनावडे यांना केंद्रप्रमुख पदी पदोन्नती.


सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

जिल्हा परिषद सातारा यांचे वतीने शिक्षण विभागातील शिक्षकांना पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली.यावेळी मामुर्डी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश धनावडे यांना मेढा केंद्राचे केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली.

ADVERTISEMENT

श्री.सुरेश धनावडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे सन २०१८ पासून कार्यरत होते.या काळात मामुर्डी शाळेला स्वच्छ सुंदर गुणवत्तापूर्ण उपक्रमशील शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता.तसेच गतवर्षी झालेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.क्रिडा स्पर्धा व शिष्यवृत्ती परिक्षेत मामुर्डी शाळा कायम आघाडीवर राहिली आहे.

केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी यांचे हस्ते  धनावडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार सुनील धनावडे,ज्ञानदेव भिलारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!