घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत स्वतःच्या घरावर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्याची आव्हान :मनोज भोसले


सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

“हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा”

• स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठा उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला आहे

गेल्या दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे केले जात आहे

देशांमध्ये महाराष्ट्र राज्याने या अभियाना अंतर्गत लक्षवेधी कामगिरी केली आहे

• केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार हरघर तिरंगा अभियान देशातील सर्व राज्यात साजरे केले जाणार आहे

• महाराष्ट्रात देखील हे अभियान मोठया उत्साहात साजरे करण्यात येईल दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या दरम्यान घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे करण्यात येणार आहे

गेल्या दोन वर्षात घरोघरी तिरंगा ही लोक चळवळ बनलेली आहे

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी मन की बात मध्ये दिनांक २८ जुलै २०२४ च्या भागांमध्ये घरोघरी तिरंगा या संदर्भात मांडलेली भूमिका 1) तिरंगा यात्रा , 2) तिरंगा रॅली ,3) तिरंगा मॅरेथॉन ,4) तिरंगा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम ,5) तिरंगा कॅनव्हॉस ,6) तिरंगा प्रतिज्ञा

प्रतिज्ञा

मी शपथ घेतो/घेते की, मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. ,7) तिरंगा सेल्फीज् ,8) तिरंगा ट्रिब्युट ,9) तिरंगा मेला अपेक्षित कार्यवाही

• दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान विविध कार्यक्रमांचे / उपक्रमांचे आयोजन

• ०९ ऑगस्ट २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, व मंत्री सांस्कृतिक कार्य यांच्या उपस्थितीत ऑगस्ट कांती मैदान येथे अभियानास सुरवात होणार आहे.

• घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवणे

प्रत्येक गाव / शहर मध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्याबाबत ग्राम विकास विभाग व नगर विकास विभाग समन्वय साधतील. यामध्ये पोस्ट ऑफिस / खादी ग्रामोद्योग/ खाजगी आस्थापना / महिला बचत गट / स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असेल.

सर्व प्रकारची शासकीय / निमशासकीय कार्यालय, आस्थापना प्रतिष्ठाने यांनीही या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे

• नागरिकांनी स्वतः तिरंगा ध्वज खरेदी करून आपल्या घरावर फडकवणे

• या अभियानाला व्यापक प्रसिद्धी माहिती जनसंपर्क महासंचालनालय देईल.

• लोकप्रतिनिधि व स्थानिक स्वराज्य संस्था यांना या अभियानामध्ये सहभागी करून घेणे. तसेच मा. पालकमंत्री महोदयांनी आपापल्या जिल्ह्यात या उपक्रमात सहभागी होवुन मार्गदर्शन करावे.

• मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्रीमंडळाचे सदस्य, सर्व लोकप्रतिनिधींनी स्थानिक जनतेला अभियानात सहभागी होणयासाठी आवाहन करणे. (व्टिटर व समाजमाध्यमाव्दारे)

 

• राज्यातील सर्व घरांवर तिरंगा ध्वज फडकवणे अपेक्षित आहे. राष्ट्रध्वज जवळच्या पोस्ट कार्यालयात उपलब्ध

 

जिल्हास्तरावरील / शहरातील महत्वाच्या शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई

 

• राज्यातील मोठ्या धरणांवर तिरंगा रोषणाई

 

• १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी harghartiranga.com वर अपलोड करणे अपेक्षित.”हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा”

 

या अभियानात राविण्यात येणाऱ्या प्रमुख ९ बाबी आहेत

 

तिरंगा यात्रा

 

तिरंगा रॅलीज्

 

तिरंगा मॅरेथॉन

 

तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम

 

तिरंगा कॅनव्हॉस

 

तिरंगा प्रतिज्ञा

 

तिरंगा सेल्फीज्

 

तिरंगा ट्रिब्युट

 

तिरंगा मेळा अभियाना करिता प्रचार प्रसिद्धी पुढील प्रमाणे आहे

 

• आकाशवाणीवरून जिंगल व बातमीपत्र

 

* दूरचित्रवाणीवरून जाहिराती व बातमीपत्रे

 

* मुद्रित माध्यमातून जाहिराती व बातमीपत्र

 

• शासकीय विभागाच्या संकेतस्थळावर उल्लेख

 

• घरोघरी तिरंगा विषयक गाणी

 

* घरोघरी तिरंगा विषयक माहितीपट

 

• घरोघरी तिरंगा विषयक सेलिब्रिटीचे आवाहन

 

* समाज माध्यमाद्वारे प्रचार प्रसिद्धी अभियानाची संख्यात्मक माहिती पुढील प्रमाणे आहे

 

नागरी क्षेत्रातील घरांची संख्या ९६ लक्ष

 

ग्रामीण क्षेत्रातील घरांची संख्या – १ कोटी ४६ लक्ष

 

दुकाने, खाजगी आस्थापना यासह सुमारे २.५ कोटी “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा”अभियान करिता सांस्कृतिक कार्य विभाग – राज्य समन्वयक विभाग व ग्राम विकास विभाग – ग्रामिण क्षेत्राकरिता नगर विकास विभाग ,नागरी क्षेत्राकरिता माहिती व जनसंपर्क संचालनालय व्यापक प्रसिद्धी ,सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन विभागाकडे याबाबतची जबाबदारी देणेत आली आहे. तरी जावली विकास गटातील सर्व नागरिकांनी घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत स्वतःच्या घरावर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन श्री.मनोज भोसले ,गट विकास अधिकारी , पंचायत समिती ,जावली (मेढा) यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!