लोणंद पोस्ट ऑफिस मध्ये केलेल्या रजिस्टर ची पोच पावती न मिळाल्याने गलथान कारभार.
उपसंपादक :दिलीप वाघमारे
लोणंद पोस्ट ऑफिस मध्ये काही दिवसापूर्वी सातारा येथे शासकीय कार्यालयास रजिस्टर पत्रव्यवहार केला होता त्याची पोहोच आज येईल उद्या येईल या आशेने संबंधित कुटुंब वाट पाहत होते अखेर पंधरा दिवसानंतर पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला अशा गलथान कारभारामुळे विश्वास कोणावर ठेवायचा केंद्र शासनाच्या पोस्ट ऑफिसमध्ये असा कारभार केव्हापासून सुरू आहे यापुढील काळामध्ये कुटुंबाने रजिस्टर करायचे की नाही या संभ्रमात ग्रामस्थ आहेत याची जाण लोणंद पोस्ट मास्तर दखल घेतील काय या घटनेकडे जिल्हा पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन ग्रामस्थांचे तक्रारीचा निपटारा योग्य काळात पारदर्शक होईल याची काळजी केंद्र शासन घेईल काय नाहीतर ग्रामस्थांना आंदोलन करायला भाग पडेल याची वेळ पाहू नये असे ग्रामस्थांचे मागणी आहे


