झाडांना राखी बांधून पर्यावरणपुरक रक्षाबंधन सण साजरा करताना वाठार हि.मा शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश..
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
“झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार हि.मा.येथे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांचे हस्ते झाडांचे पूजन करुन झाडांना राखी बांधून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी दि.१९ऑगस्ट२४ रोजी पर्यावरणपुरक रक्षाबंधन सण साजरा केला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या उक्तीनुसार झाडे,वेली,पशू पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत. इतर प्राण्यांप्रमाणे झाडेदेखील सजीवच आहेत.माणसांप्रमाणेच झाडांनाही संगीत आवडते, त्यांनाही संवेदना आहेत पणं त्या अप्रत्यक्ष.
याप्रमाणेच या वाठार हि.मा.शाळेच्या आवारात एक पिपरणचा वृक्ष आहे.
या वृक्षावर चिमणी ,कावळा, तांबट, बुलबुल इ.पक्ष्यांची घरटी आहेत.अधूनमधून पंढरपूरी चिमण्या,भारद्वाज पक्षी तसेच निळया रंगाच्या ख॔ड्या पक्ष्याचेही दर्शन घडते.उन्हाळ्यात झाडावर छोटी छोटी फळे येतात. फळे खाण्यासाठी झाडावर पक्ष्यांची गर्दी होते.झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट तर शाळेत मुलांचा चिवचिवाट सुरू असतो. हा पिपरण वृक्ष शाळेचाच एक भाग बनलेला आहे. रोज सकाळी शाळेत आल्याबरोबर मुले झाडाच्या अवतीभोवती खेळत असतात. दुपारच्या सुट्टीत झाडाखाली बसून पाढे पाठांतर करणे,कविता पाठांतर करणे, पाठवाचन करणे, गाण्यांच्या भेंड्या खेळणे इत्यादी बाबीमध्ये मुले रमून जातात.या पिपरण वृक्षाच्या थंडगार सावलीमुळे कडक उन्हाचा त्रास जाणवत नाही. त्याचप्रमाणें आपल्या जगण्याला, जिवंत असण्याला ज्यामुळ अर्थ आहे तो म्हणजे ऑक्सीजन ह्याचं वृक्षरुपी देवाकडून आपण घेतो.आणि त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होणे शक्य नाही,पण त्याच्याबरोबर रक्षाबंधन दिनी हा त्यांच्या रक्षणाचा सलोख्याचा सण साजरा करून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. याप्रसंगी उत्रौली केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजना वाडकर मुख्याध्यापक रमेश कुंभार,शिक्षक वर्गातील सहशिक्षक विठ्ठल आखाडे,निलीमा शिंदे, केदारनाथ परमहंस यांसह शाळेतील सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.


