डॉल्बीसाठी मॉडीफाय केलेल्या वाहनावर शाहूपुरी पोलिसांची कारवाई; गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जनतेस विनंती
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
डॉल्बीसाठी मॉडीफाय केलेल्या वाहनावर शाहूपुरी पोलिसांनी कडक कारवाई करत साऊंड सिस्टिम मालकावरही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना शाहूपुरी हद्दीमधील गणपती आगमन सोहळ्यामध्ये डॉल्बी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी मालकांवर कडक कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज ही कारवाई करण्यात आली…..
गणेशोत्सव काळात जनतेच्या हितासाठी व सामाजिक सलोखा व ऐक्य निर्माण होण्यासाठी समाजमनाने शांतता व सलोखा राखून प्रशासनास सहकार्य करावे. अघटित अगर समाज विघातक कृत्य निदर्शनास आल्यास कायद्यान्वये अंमलबजावणी केली जाईल.
राजेंद्र सावंत्रे पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस स्टेशन


