भोर तालुक्यातील कुसगाव गावात भरडी मशीनमध्ये हात जाऊन महिलेचा मृत्यू.


 

भोर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील उत्तरेकडील कुसगाव गावात रंजना दत्तात्रय गोरे वय 35 वर्ष या महिलेचा मशीनमध्ये हात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये बाळू नामदेव गोरे वय 50 वर्ष यांनी खबर दिली आहे.

ADVERTISEMENT

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि. २३/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. चे सुमारास बाळू गोरे व त्यांची पत्नी संगिता त्यांच्या घराचे जवळ जनावरांचे गोठयात काम करीत होते. त्यांचा भाउ दत्तात्रय हा दुध घालणेकरीता पुणे येथे गेला होता. भावजय सौ. रंजना दत्तात्रय गोरे वय ३५ वर्षे यांचे घरासमोर सोयाबीन भरडणेकरीता ट्रॅक्टर व सोयाबीन भरडण्याचे मशीन आल्याने तिने मशिन चालु करुन सदर मशीनमध्ये सोयाबीन भरडत होती. सकाळी ११.३० वा. चे सुमारास लोकांना आरडा ओरडा झाल्याने काय झाले हे पाहणेकरीता बाळू गोरे व पत्नी सौ. संगिता असे दोघे तिकडे जावून पाहीले असता भावजय सौ. रंजना ही सोयाबीन भरडत असताना मशीनचे पट्ट्यामध्ये तिचे साडीचा पदर अडकुन ती साडीसह मशीनमध्ये अडकुन अपघात घडला असल्याचे पाहीले. त्यात भावजय सौ. रंजना हिस शरिरावर ठिक ठिकाणी गंभीर जखमा झाल्याने तिस जमलेले लोकांचे मदतीने भरडी मशीनमधून बाहेर काढून उपचारकामी श्लोक हॉस्पीटल खेड शिवापुर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तिस तपासून दुपारी ०२.५० वा. मयत घोषीत केले. त्यानंतर मयताची खबर देण्यास पोलीस चौकी येथे आले.

याबाबत अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!