लक्ष्मी नगरमध्ये ‘कचऱ्यातून कांचन’ घडवणाऱ्या रणरागिणींचा सन्मान


पुणे प्रतिनीधी | एस.एन.नांदेडकर

 

सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे महानगरपालिका आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर परिसरात वस्ती विकास उपक्रमांतर्गत महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षिका भार्गवी ढवळीकर मॅडम यांनी चॉकलेट मेकिंगचे प्रशिक्षण दिले.

 

गेल्या पाच वर्षांपासून “घनकचरा व्यवस्थापन” या केंद्रबिंदूवर “वस्ती विकास समिती”च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदणी, शासकीय पत्रव्यवहार आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून समितीत ३२ सक्रिय सदस्य कार्यरत आहेत. या उपक्रमांमुळे शेड उभारणी, भिंत सुशोभीकरण, अभ्यासिका सुरू करणे तसेच स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे.

ADVERTISEMENT

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कमिन्सचे पदाधिकारी रमेश डुमरे सर, वर्षा धुमाळ मॅडम, आरोग्य निरीक्षक करण कुंभार सर, गणेश सर, मुकादम बाबा वैजनाथ गायकवाड सर तसेच सेवा सहयोगच्या प्रकल्प व्यवस्थापक श्वेता सूर्यवंशी मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांचा रोपवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी वर्षभरात कचऱ्यातून कांचन घडवणाऱ्या महिलांचा, प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा तसेच १५ वस्ती विकास समिती सदस्यांचा गिफ्ट व रोपवृक्ष देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा सहयोगचे युवराज सर, मंदार सर आणि हेमंत सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

मान्यवरांच्या मनोगतानंतर युवराज सरांनी आभार प्रदर्शन केले, तर सूत्रसंचालन संघशील भद्रे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!