पुसेगाव- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना आज श्री क्षेत्र पुसेगाव येथे महायुतीचा पदाधिकारी, समन्वयक व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.


सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने आजपर्यंत प्रत्येकवेळी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या प्रेमाला व आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे.

माझी बांधिलकी ही राजकारण नसून समाजकारण आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक दिग्गज नेते होऊन गेले. त्यांनी समाजकारणातून खूप मोठे काम केलेले आहे. आज छत्रपती घराण्यातून समाजकार्यातून अनेक लोकांच्या समस्या सोडवत आहे. त्यामुळे निवडणुका हे फक्त माध्यम आहे. आजही निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातही लोक अडीअडचणी घेऊन येतात. त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि तो अखंडपणे करत राहणार आहे. आजची युवक व लहान मुलं आहेत ते देशाच्या प्रगतीचे पायाभरणी करणारे नागरिक आहेत. त्यांना घडवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

ADVERTISEMENT

यावेळी आमचे मित्र कोरेगाव चे आमदार महेश शिंदे, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चेअरमन रणधीर जाधव, कोरेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख भरत मुळे, माजी चेअरमन मोहनराव जाधव,बाळासाहेब जाधव, विश्वस्त संतोष वाघ, अभयराजे घाडगे,राहुल पाटील,कृष्णात सावंत, महेश गुरव,सुसेन जाधव, सुरज जाधव,शरद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!