लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील रस्त्यावर पाणी ये जा करताना प्रवासी वर्गाची कसरत
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
दि. २४ लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील भारतीय स्टेट बँक ते गांधी चौक कोपरा मेन रोडच्या पाठीमागील पूर्वीचा डांबर रस्ता होता परंतु गटर कामकाजामुळे पूर्ण रस्ता उखडला गेला गेल्या वर्षभर हा रस्ता जैसे थे आहे या रस्त्यावरून पावसाळ्यात घडूळ पाणी साचलं जातं त्यावरून आजूबाजूचे रहिवासी धारक तसेच स्टेट बँकेचे कस्टमर व आठवडा बाजार करू यांना या रस्त्यावरून ये जा शॉटकट सातत्याने करावी लागते तसेच गटर बांधकाम उंची वाढल्याने या रस्त्यावरील पाणी गटामध्ये जाण्यास मार्ग नाही साचलेल्या पाण्यामधून ग्रामस्थांना येजा करावे लागते त्यामुळे नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे


