गांजे / मालचौडी वि.का.स. सेवा सहकारी संस्थेचे सचिव अनिल धनावडे साहेब यांचे आदर्शवत कामकाज.
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा : जावली तालुक्यातील गांजे / मालचौंडी विकास संस्थेच्या माध्यमातुन अभिनव उपक्रम राबवीत असून संस्थांची आर्थिक उलाढाल वाढवून संस्थांच्या माध्यमातून नियमीत कर्ज भरणाऱ्या सभासदांसाठी नाविन्यपूर्ण योजना योजना राबवल्या जात आहेत.संस्थेचा कर्जदार सभासद मयत झाल्यास संस्थेकडून सदर कुटुंबास रोख स्वरूपात रक्कम रु. ५०००/-आर्थिक सहाय्य दिले जाते .तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांपैकी ५ सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बक्षीस दिले जाते . संस्थेची वसुली दरवर्षी बँक पातळीवर १००%असून संस्था पातळीवर मार्च अखेर ९० ते ९२% असते.गेली १० ते १५ वर्षे सातत्यपूर्ण डिव्हिडंड वाटप केला जातो त्यांनी राबवलेल्या मयत सभासद कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेस सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे . संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालकखाली आलं पाहिजे मंडळ सर्व सभासदांचे सहकार्य होत असून त्यांच्याकडून कौतुकही केले जात आहे .
मयत सभासदाचे कुटुंबास रोख स्वरूपात रक्कम रुपये ५०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



